कारेगाव: शिंदोडी सारख्या गावातून शेतकरी कटुंबातून आलेल्या शिवलिंग वांगणे यांनी कारेगाव येथे अतिशय प्रतिकुल परिस्थितीत यांनी हॉटेल व्यवसायात जम बसवला असुन त्यांनी केलेली प्रगती उत्तम असल्याचे मत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.

कारेगाव येथील गजबजलेल्या यश इन चौकात शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हॉटेल जगदंबचं उदघाट्न करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन निलेश लंके तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अशोक पवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले, आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मध्ये नोकरीवर अवलंबून न राहता शिवलिंग वांगणे यांनी व्यवसायाची वेगळी वाट निवडली हे कौतुकास्पद असुन हॉटेल व्यवसायात त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी. तसेच या हॉटेलच्या आणखीन शाखा वाढवाव्यात.

जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र जगदाळे म्हणाले, शिवलिंग वांगणे आणि मी कराटे शिकायला एकत्र होतो. कराटे शिकल्यानंतर त्यांनी काही दिवस कराटे क्लास घेतले आणि त्यानंतर हॉटेल व्यवसायात पदार्पण केल याचा मनस्वी आनंद आहे.

यावेळी जनता दल सेक्युलरचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, उद्योजक सुनील ओस्तवाल, कारेगावचे उपसरपंच संदीप नवले, ग्रामपंचायत सदस्य शहाजी तळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल गवारे, ह भ प राहुल महाराज राऊत, शिंदोडीचे सरपंच अरुण खेडकर, शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ वाळुंज, संचालक विठ्ठल दुर्गे, शिवसेना शेतकरी सेनेचे माजी तालूकाध्यक्ष योगेश ओव्हाळ, भगवंत वाळुंज सर, रामकृष्ण गायकवाड, मछिंद्र खैरनार, पत्रकार पोपट पाचंगे, नवनाथ खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.