विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बीड (प्रतिनिधी) कमळाबाई म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो? असा सवाल करत दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर आमचाच होणार असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘चुन चुन के मारेंगे’ असे म्हणणारे शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना खुले आव्हान देत शिवसैनिकाला चुन चुन के मारणारा अजून जन्माला यायचाय. हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन लढा, मग कोण चुनतो आणि कोण गिनतो हे पाहू, असे खुले आव्हान या वेळी अंबादास दानवेंनी दिले.

बीड तालुक्यातील समनापूर येथील नवनाथ शेळके या तरुण शेतकर्‍याने गेल्या काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ रुईलिंबा येथील भागवत किसन पिसाळ या शेतकर्‍यानेही कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जिवनयात्रा संपविली होती. मराठवाड्यात गेल्या आठ ते नऊ महिन्याच्या कालखंडात 177 पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये बीडचा आकडा मोठा आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा विषय गंभीर बनत चालला असून आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना भेटी दिल्या. सर्वप्रथम समनापूर येथील नवनाथ शेळके व नंतर रुईलिंबा येथील भागवत मिसाळ या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या वेळीत यांच्या सोबत जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, बंडु पिंगळे, दिलीप गोरे, गोरख शिंगण, नितीन धांडे, परमेश्वर सातपुते आदी उपस्थित होते.