नागपुर: कराटेचे प्रशिक्षण घेताना त्या दोघांची ओळख झाली. त्यातुनच पुढे मैत्री आणि मग शारीरिक संबध आल्याने ती मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली. अल्पवयीन असलेल्या दोघांनाही गर्भपाताबाबत माहिती नसल्याने मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिच्या आईने दवाखान्यात नेल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे उघडकीस आल्याने आईने विचारणा केली असता मुलीने प्रियकराचे नाव सांगितल्याने जरीपटका पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन संबंधित प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

जरीपटक्यात राहणारी दहावीची विद्यार्थिनी असलेली १६ वर्षीय मुलगी कराटे क्लासला जात होती. त्याच प्रशिक्षण केंद्रात सराव करणाऱ्या १७ वर्षीय मुलाशी तिची मैत्री झाली. त्यानंतर आरोपी मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सप्टेबर २०२१ मध्ये तिला अंबाझरीतील एका मित्राच्या घरी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर दोघेही वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागले. यादरम्यान ती चार महिन्याची गर्भवती झाली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.