जिंतूर मतदार संघातील झालेले रस्त्यांची अवस्था पाहता या मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सत्ता नसताना सुद्धा आणि मराठवाड्याच्या विकासासंदर्भात अनुकूल असे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याकडे सतत पाठपुरावा करून आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये वारंवार रस्ते आणि पुलाच्या कामाच्या संदर्भात सातत्याने आवाज उठवून सर्व सहभागृहाचे लक्ष वेधून आपल्या मतदारसंघात विविध विकास कामे प्राधान्याने मंजूर केल्याचे आपल्याला दिसून आलेले आहे,परंतु काही विघ्नसंतोषी खोटारड्या लोकांच्या पोटात दुखण्याचे प्रकार थांबता थांबत नाहीत चार वर्षांपूर्वीच विरोधक विजय भांबळे जेव्हा आमदार होते त्या काळातच जिंतूर शहरातील याच रस्त्याच्या कामावर तब्बल चार कोटी रुपये मंजूर झालेले होते तेही केवळ कागदावरच काम झाल्याचे आढळून येते या जनतेने शहरातील रस्त्याचे काम तर पाहिलेलच नाही कधी झालं आणि कधी संपलं शहरवासीयांना केवळ धुळीचा सामना करावा लागत होता.
या शहरीवासीयांचा त्रास कमी होण्यासाठी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जिंतूर शहरातील फाळेगाव येलदरी जिंतूर राज्य मार्ग 248 रस्त्यावरील (येलदरी भाग व जिंतूर शहरातील भाग) रू. 15 कोटी आणि सेलू शहरातील रामा 253 ते छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ते प्रजीमा 548B किमी 0/00 ते 5/200 ता.सेलू रू.30 कोटी या दोन्ही कामाची शिफारस तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत बजेट प्लेट आमदार महोदयांच्या शिफारशीने हिवाळी अधिवेशन 2021- 22 मध्ये केलेली असताना आणि त्यास यांनी मंजुरी दिलेली असताना देखील विरोधक मात्र सदर काम मी मंजूर केल्याचे सांगत आहेत पदावर नसताना आणि कुठेही याचा ठावठिकाणा नसताना देखील चुकीच्या पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याचे काम सध्या त्यांच्याकडून होत असताना दिसत आहे या सर्व कामाची दखल वर्तमानपत्रांनी देखील घेऊन त्यावेळी सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे की काम कोणी मंजूर केले आणि कुणी याचा पाठपुरावा केलेला आहे याचे साक्षीदार मतदार संघातील सर्व जनता आहे त्यामुळे विनाकारण सदर कामाचे श्रेय कोणी घेण्याचे काहीही कारण नाही.