सेलू शहरातील अरब गल्ली परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ प्रतिबंधित असलेल्या गोवा गुटखा घेऊन जात असताना सेलू पोलिसांनी अरुण शिवाजी पांचाळ या इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ३ सप्टेबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पोलिसांनी केली.

          सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील अखिल व अरुण पांचाळ हे दोघे जालना येथून दुचाकीवरुन अवैध गुटखासाठा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती सेलू पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही अरब गल्ली परिसरातील पाण्याच्या टाकीजवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे जवळपास ६२ हजार ७४० रुपयांचा साठा आढळून आला. या प्रकरणी पोशि मधुकर ढवळे यांच्या फिर्यादीवरुन दोघा विरुध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोनि. रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अंधारे, पठाण हे करीत आहेत.