बीड विद्युत तारेचा शॉक लागून आई सह दोन मुलांचा जागीच मृत्यू, गावात हळहळ व्यक्त.
बीड:- (नितीन थोरात)गेवराई घटना तालुक्यातील भेंडटाकळी तांडा राठोड वस्ती येथे आज (दि.३) रोजी दुपारी विजेचा शॉक लागून आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. शेतात पडलेल्या विद्युत तारेचा अचानक दोन मुलांना शॉक बसल्याचे पाहून त्याच्या आईने त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली.मात्र, तिला देखील विद्युत तारेचा शॉक बसला. या घटनेत दोन्ही मुलांसह आईचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ललीता श्रीकांत राठोड (वय ३०) अभिजीत श्रीकांत राठोड (वय ८), प्रशांत श्रीकांत राठोड (वय ११) अशी मृतांची नावे आहेत.
याबबतची माहिती अशी की, ललीता राठोड या दोन्ही मुलांसह आज शनिवारी (दि.३) रोजी दुपारी भेंडटाकळी तांडा शिवारातील आपल्या शेतात गेल्या होत्या. खेळत असताना दोन्ही मुलांचा खाली पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. दोघेांना विजेचा शॉक बसल्याचे पाहताच त्याची आई ललिता त्यांना वाचविण्यासाठी धावली. मात्र, त्यांना देखील विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेत आई आणि दोन मुले असा तिघांचा मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ऐन सणासुदीच्या दिवसांत सदरील घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.