जिंतूर तालुक्यातील मोहाडी येथील इसम सेलू रेल्वे स्थानकावरून नाशिकला जाण्यासाठी शुक्रवारी ( दि.२ ) रात्री ८ वाजता निघालेल्या नंदिग्राममध्ये चढताना तोल जाऊन तो प्लँटफार्मवर पडला.त्यास गंभीर जखमी असस्थेत रेल्वे पोलीसांनी रुग्णवाहिकेतून सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारदम्यान रात्री ९ वाजता त्याचा मुत्यु झाला. चोखाजी किशन निकाळजे (वय ५८ वर्ष रा.मोहाडी ता.जिंतूर ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चोखाजी किसन निकाळजे (वय ५८ वर्ष) हे देवगाव फाटा येथील शाखेतून निराधाराचे अनुदान उचलून नाशिकला जाण्यासाठी २ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता सेलू रेल्वे स्थानकावर आले होते. सेलू येथून निघालेल्या नंदिग्राम रेल्वेत चढत असताना तोल जाऊन ते प्लँटफार्मवर पडले.ही माहिती पोलीसांना मिळताच रेल्वे पोलीस उपनिरीक्षक रोहीदास नाटकर यांनी या जखमीला एका रुग्णवाहिकेतून सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान मयताचे शवविच्छेदन सेलू उप जिल्हा रूग्णालयात करण्यात आले असुन शनिवारी (दि.३) रोजी मयतावर त्यांच्या मुळगावी मोहाडी ता.जिंतूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, पाच मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.