पोलीस कर्मचाऱ्यांची आढाव बैठक 

पाचोड/

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा (दि‌ १२)रोजी पैठण येथे दौरा असून व श्रीगणपती विसर्जन मिरवणुकी संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण ता.पोलीस उपविभाग अंतर्गत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल पाटील यांनी आज शनिवार (दि.३) रोजी पैठण, पाचोड, बिडकीन, एमआयडीसी, या परिसरातील गोपनीय शाखेचे कामकाजा संदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांची आढाव बैठक घेतली. या बैठकीत गोपनीय शाखेचे अभिजीत सोनवणे, संदीप जाधव, मनोज वैद्य, कृष्णा उगले, बनगे, यांच्यासह पैठण येथील डीवायएसपी पथकाचे गणपत पवार, सचिन भूमे, सोनवणे, सुनील काकडे सह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते