जिंतूर तालुक्यातील विविध पक्ष, संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष आ. सुरेशराव वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष नानासाहेब राऊत, मनपाचे माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, माजी सभापती गुलमीर खान, परभणी तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, समशेर वरपुडकर, प्रकाशराव देशमुख, मनपाचे माजी सदस्य विशाल बुधवंत , जिंतुर तालुकाध्यक्ष गणेशराव काजळे, इजी. मिडीया प्रमुख सुहास पंडीत, तहेसीन देशमुख, अनवर पटेल, गुलाबराव ईखे, वामनराव लगड, अब्दुल सलाम, अनवर बेग, शेख ईब्राहीम, बाळु जिवने, प्रभाकर ईखे, पाशा पठाण, अंकुश ईखे, जालींदर जिवने, मुजाहीद कादरी, ज्ञानेश्वर सावळे, शेख ईब्राहीम, अब्दुल सलाम आदी पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष मजबुतीसाठी व प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध असून सर्वतपरी मी आपल्या सोबत राहील अशी ग्वाही आ. वरपुडकर यांनी दिली. राऊत यांनी आ. वरपुडकर व सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली जिंतुर मतदारसंघात काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवेल असे वक्तव्य केले. माजी उपसभापती मोबीन कुरेशी, ग्रा.प.सदस्य आन्ना हराळे, सदाशिवअण्णा घुगे, रियासोद्दीन बाबामियॉ शेख, गुलाब पाशा नाईक, अ. रौफ अन्सारी, बाबुराव सोनवणे, बाबासाहेब बहीरट, रविभाऊ देशमुख, बाळुभाऊ देशमुख, प्रल्हादराव देशमुख, महेबुब पट्टेदार, उत्तमराव सांगोळे, शेख एजाजभाई, हाजी बशीर पठाण, मुंजाभाऊ बहीरट, सचिन बहीरट, अमोल बहीरट, बाळुभाऊ बहीरट, संजय बहीरट, अशोकराव शिंदे, बाळुभाऊ वडावाले, शेख समदभाई, हसन शेख, संजय घनवटे, शेख जमालभाई, अक्षय सोनवणे, अनवर बेग, बाळु सभांजी जिवणे आदी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुत्रसंचालन उध्दवराव रामपुरीकर,व पाशा पठाण तर इजि.सुहास पंडीत यांनी आभार प्रदर्शन केले.