'स्वर' फाउंडेशन चा पुढाकार
गंगाखेड-
मागील पाच वर्षापासून गंगाखेड सह जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणाऱ्या स्वर फाउंडेशनच्या माध्यमातून शनिवारी शिवाजीनगर तांडा येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संत महंतांच्या उपस्थितीत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
पंधरा दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती. तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या.शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याची आवश्यकता जाणवल्यानंतर स्वर फाउंडेशनचे अध्यक्ष रंजीत शिंदे यांच्याशी संपर्क साधून या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आज येथील शाळेतील उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी परभणी जिल्ह्याच वारकरी संप्रदायाचे वैभव संत देवरईमाय संस्थांन चे मठाधिपती तुळशीदास महाराज देवकर ,ह भ प निवृत्तीनाथ महाराज ईसादकर ,बंजारा भूषण गोविंद महाराज पोहनडुळकर आदि संत महंत यांचे हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी स्वर फाउंडेशनचे रणजीत शिंदे, आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव यादव, वरपुडकर संस्थेचे सचिव नागनाथराव निरस,वाघलगावचे माजी सरपंच नारायण धनवटे,हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भाऊ भोसले, राजू खाकरे ,महातपुरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बालाजी मुंडे, सिद्धदोन भालेराव, देवईमाय संस्थांनचे उपाध्यक्ष साहेबराव जाधव, बालासाहेब शेवाळे, साहेब लवंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विनायकराव राठोड हे होते. कार्यक्रमाचे संचालन रुद्रवार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चव्हाण ,सिरसाठ एस. जी,सरदे एस. एस.,गडमे यू .यन,आत्तार आर. ए,
कदम आय .व्ही आदींनी प्रयत्न केले. यावेळी ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ डी. डी. चव्हाण ,डी. जी.चव्हाण ,पंडित राठोड विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी बंजारा संस्कृतीच्या पेहरावात पाहुण्यांचे स्वागत केले.