श्री शिवाजी डी एड कॉलेज वाशिम येथे नुकताच डि एड प्रथम वर्ष छात्रध्यापकांचा स्वागत समारोह व पालक सभा संपन्न झाली.यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. एँड.किरणराव सरनाईक यांना आमंत्रित करण्यात आले होते. सर्वप्रथम पाहुण्याच्या हस्ते प्रतिमेचे पूजन हारअर्पण दिपप्रज्वलन करून आदरणीय आमदार साहेबांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी सौ भारती देशमुख यांनी केले. प्रस्ताविकामध्ये त्यांनी डि.एड प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन वर्षभरात डी एड कॉलेजमध्ये कोण कोणते उपक्रम राहतील याची थोडक्यात माहिती देऊन छात्रध्यापक कॉलेजमध्ये शिस्तीने नियमित राहिले तर त्यांचा कसा फायदा होईल याचे महत्त्व विशद केले तसेच दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आमच्या डी एड कॉलेजमध्ये १०० टक्के प्रवेश क्षमतेची उत्कृष्ट परंपरा कायम राखली हे विशद केले.  तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आमंत्रित मान्यवर शिक्षक आमदार एँड.किरणराव सरनाईक यांनी छात्रध्यापकांना सर्वप्रथम त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच १०० टक्के प्रवेश झाल्याबद्दल सर्व डि. एड कॉलेज च्या प्राध्यापकांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. आपल्या मनोगतात त्यांनी छात्रध्यापकांनी आपल्या उन्नतीसाठी स्वयंशिस्त जिद्द आत्मविश्वास या समवेत कर्तव्याची जोड असेल तर हवे तेवढे यश संपादन करू शकता तसेच याप्रसंगी त्यांनी अनेक प्रेरणादायी विचार सांगुन धात्रध्यापकांचे व पालकांचे आपल्या कर्तृत्व शैलीने मने जिंकली सर्व तसेच पूर्वनियोजन करून सातत्यपूर्ण अविरतपणे परिश्रम करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी हृदय संकल्प व हृदयनिष्ठ आत्मविश्वास असणे महत्त्वाचे आहे. देशाच्या प्रगतीसाठी एका शिक्षकाचे कार्य किती प्रभावी व परिणामकारक असते हे विशद केले.  याप्रसंगी प्राचार्य रोकडे सर प्रा. खुरसडे मॅडम यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गेबल, कु. चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गायकवाड मॅडम यांनी केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी सौ भारती देशमुख प्राचार्य रोकडे सर, प्रा.खुरसडे मॅडम, प्रा.बेदरकर मॅडम, प्रा. पाटील मॅडम, प्रा.गायकवाड मॅडम, प्रा.पवार मॅडम गिर्हेताई उपस्थित होत्या.