बामणी:- परिसरातील येलदरी धरणावरील जलाशयातील मासेमारीचा ठेका घेतलेल्या संस्थेच्या विरुद्ध मच्छीमारांच्या मागणीचे जलआंदोलन आज गुरुवार रोजी संपन्न झाले आहे. यामध्ये जवळपास अडीचशे मच्छी व्यवसायिकांसह महिला लहान मोठ्यांचा सहभाग होता. यामध्ये एक महिला जलसमाधी घेताना पाण्यात बुडून बेशुद्ध झाली होती. पोलिसांनी त्या महिलेस त्वरित प्रथमोपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेऊन तिचा प्राण वाचवला.

      जलसमाधी आंदोलन हे बामणी येथील कोल्पा शिवारातील तलावाच्या कडेला घेण्यात आले स्व.राजीव गांधी मच्छी व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित बामणी या संस्थेने सदर येलदरी जलाशायातील मासेमारीचा ठेका घेतलेला असून याच संस्थेकडून आम्हा मच्छीमारांवर अन्याय होत असून आमच्यावर चोरीचे खोटे गुन्हे दाखल होत आहे. संस्था चालकांकडून आम्हास वेठीस धरल्या जात आहे. बामणी, चारठाणा, जिंतूर पोलिसांकडून आमच्यावर अन्याय होत आहे. असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. यावेळी राष्ट्रीय क्रांती सेना पक्षाचे मराठवाडा कार्याध्यक्ष नानासाहेब लकारे, जिंतूर तालुका अध्यक्ष हिरामण लहिरे,जिंतूर वी.स. अध्यक्ष प्रकाश मोरे तसेच राष्ट्रीय क्रांती सेना पक्षांचे इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मच्छीव्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांकडून प्रमुख मागणीमध्ये आमच्यावर करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे स्व.राजीव गांधी मच्छी व्यवसाय सहकारी संस्था येलदरी या संस्थेने बोगस पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असून या बोगस पदाधिकाऱ्यावर 420 नुसार गुन्हे दाखल करावे. संस्थेचा कमाईचा उद्देश बाजूला ठेवून मच्छी व्यवसायिकांच्या विकास कामावर भर द्यावी तसेच हजारो मच्छीमारांचे परवान्याचे पैसे व कमिशनचे पैसे यांच्या हिशोबाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विरुद्ध घोषणाबाजी केली हे आंदोलन गुरुवारी पहाटे सात वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होते. यामध्ये जवळपास अडीचशे मासेमारी करणाऱ्या सोबत लहान मुलांसह महिला आंदोलन हजर होते. जलसमाधी घेताना एक महिला पाण्यात बुडून बेशुद्ध झाली होती. पोलिसांनी तिला त्वरित ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करण्यास नेले आहे. मच्छीमारांकडे जवळपास 50 ते 60 होड्या व तराफे होते हे सर्व मच्छीमार तलावाच्या पलीकडील सेनगाव तालुक्याच्या हद्दीतून आंदोलन करीत आले होते. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी पांडुरंग गोफणे,सपोनि बालाजी पुंड ,पोलीस उपनिरीक्षक एस.पी.चौरे पोलीस उपनिरीक्षक राजेश नन्नवरे ,बाळू पतंगे.आर सी पी चे पथककासह पोलीस कर्मचारी महिला पोलीस होमगार्ड इतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

  तसेच प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय प्रशासकीय अधिकारी अशोक शेजुळ, जिल्हा मच्छ विकास अधिकारी अश्विनी पाटील सह मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अजित सुरवसे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते यावेळी नानासाहेब लकारे व मच्छीमारांनी मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना देऊन आंदोलनास माघार घेत आंदोलन समाप्त केले.