बीड ( प्रतिनिधी ) बीड शहरातील जुना मोंढ्यातील उर्वरित सिमेंट रस्ता व नाला बांधकाम संदर्भात युवा नेते डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी व्यापाऱ्यांशी बैठक घेत संवाद साधला.यावेळी उर्वरित काम येत्या आठवड्यात सुरू करणार असल्याचे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले.व्यापारी केंद्राच्या दृष्टीने शहरातील जुना मोंढा अत्यंत महत्वाचा समजला जातो. या ठिकाणी मोठ्या संख्येने रोज अवजड वाहनांची वर्दळ असते व परिसर सतत गजबजलेला असतो. यामुळे या ठिकाणी अत्यंत दर्जेदार काम होणे गरजेचे आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना नागरिकांची व व्यापारी बांधवांची हेळसांड व गैरसोय होवू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे शहरातील सुभाष रोड, डी. पी. रोड, कॅनॉल रोड, भाजी मंडई रोड, कंकालेश्वर मंदिर ते शहेंशावली दर्गा आदी मुख्य रस्त्यांच्या धर्तीवर हे काम केले जाणार असल्याचे देखील डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबुशेठ लोढा, मा.नगरसेवक अमर नाईकवाडे, अतुलशेठ मौजकर, जवाहरशेठ कांकरिया, विनोद पिंगळे, अशोक शेटे, मदन अग्रवाल, वर्धमान खिंवसरा, गोपाळ अग्रवाल, गोविंद तोष्णीवाल, पारस संचेती, रमेश कात्रेला, अशोक शहागडकर, निलेश लोढा, निलेश खिंवसरा, सुदर्शन तापडिया, शिवाभाऊ भुरे, संजय अग्रवाल, सतिश दुंगरवाल, मनिकशेठ पागारीया, माऊली मुंडे, उमेश कासाट, डॉ.केतन मुनोत आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.