आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय मुलीचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू

नाशिक :( नितीन थोरात) पालक आपल्या पाल्याचे सर्व हट्ट पूर्ण करतात मात्र नाशिक मध्ये चार वर्षीय मुलीचा आईस्क्रीमचा हट्ट पूर्ण करण जीवावर बेतले आहे.मेडिकल स्टोअरमध्ये आईस्क्रीम घेण्यासाठी गेले असता मुलीला इलेक्ट्रिक शॉक लागून तिचा मृत्यू झाला आहे.

 

ग्रीष्मा विकास कुलकर्णी असे मुलीचे नाव आहे. हि सर्व घटना मेडिकल मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

अशी घडली घटना

 

विशाल कुलकर्णी हे परिवारासोबत नाशिक मधील उंटवाडी येथे राहतात. विशाल यांचा नाशिकमध्ये खाजगी व्यवसाय आहे. गुरुवारी (१ ऑगस्ट) घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत गणपती बाप्पाची आरती केली. यांनतर ग्रीष्माने वडिलांकडे आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला. ग्रीष्मा ऐकत नसल्याने अखेर वडील तिला जवळच असलेल्या मेडिकल मध्ये घेऊन गेले. या मेडिकलमध्ये आईस्क्रीमचे मोठे फ्रीज होते. आईस्क्रीम मिळण्याचा आनंद ग्रीष्माला होता. फ्रीजर मधील विविध फ्लेवरचे आईस्क्रीम मधून फ्लेवर निवडण्यासाठी फ्रीज मध्ये डोकावण्याचा तिने पर्यंत केला. मात्र फ्रीजची उंची तिच्या पेक्षा जास्त असल्याने आईस्क्रीमसाठी तिने पाय फ्रिजरच्या ब्रॅकेट वर ठेवले आणि फ्रिजरच्या वायरचा ब्रकेट मध्ये उतरलेला इलेक्ट्रिक करंट ग्रीष्माला लागला आणि ती जागेवरच कोसळत बेशुद्ध झाली . अखेर ग्रीष्माला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

 

आइस्क्रीम फ्रिजर धोकेदायक

 

विविध शहरांमध्ये आईस्क्रीम फ्रीजर सहसा दुकानाच्या बाहेर ठेवण्यात येतात. त्यांची रात्री सुरक्षा व्हावी यासाठी त्यांना लोखंडी ब्रॅकेट तयार केले जाते. मात्र या फ्रिजरच्या खाली असलेलं फ्रिजर जाळीचा करंट बऱ्याच वेळेस ब्रॅकेट मध्ये उतरलेला असतो अनेक वेळेस शूज किंवा चप्पल घातलेली असल्यामुळे हा करंट लागत नाही. मात्र कडेवरून उतरून लहान मुले अनवाणी पायाने इथे गेले असताना शॉक लागतो. त्यामुळे अशावेळी अतिक्रमित जागेत बाहेर ठेवलेले फ्रिजर यांची तपासणी वेळोवेळी होण्याची गरज आहे. तसेच औषधांच्या दुकानाच्या बाहेर अशा फ्रिजरला परवानगी किमान द्यायला नको अशी मागणी पालकांमध्ये आता होत आहे

लहान मुल चंचल असतात. त्यांच्यावर पालकांनी नेहमी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पालकांच्या थोड्या नजर चुकीने अनेक घटना घडल्या आहेत. कुठे गरम पाण्याने तर कुठे सूक्ष्म वस्तू गिळल्याने लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा याची पुनरावृती झाल्याने आता गरज आहे ती पालकानी आपल्या पाल्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची....