सार्वजनिक नळ बंदचा निर्णय मागे घेण्यास राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार - व्यंकटेश कोंगारी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
सोलापूर :- सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात कष्टकरी कामगार आणि झोपडपट्टीवासीय आहेत. सोलापूर महानगरपालिका मार्फत सार्वजनिक नळ बंद करणे, चारचाकी व फेरीवाले गाड्यांवर लादण्यात आलेले जाचक दंड , ५ टक्के घरपट्टीत वाढ अश्या अनेक नागरी प्रश्नांना घेऊन माजी नगरसेवक कॉ.व्यंकटेश कोंगारी यांच्या मा.आयुक्त पी.शिवशंकर यांच्या सोबत बैठक पार पाडली. सार्वजनिक नळ बंदचा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा मिळवून द्यावे अन्यथा लोकांचा उद्रेक वाढेल. म्हणून आता राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती कोंगारी यांनी दिली.
सोमवारी 2 सप्टेंबर रोजी सोलापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त पी.शिवशंकर यांच्याकडे शिष्टमंडळासोबत चर्चा पार पडली.
यांच्या बैठकीत व्यंकटेश कोंगारी म्हणाले की सोलापूर शहरातील गरीब, कष्टकरी व हातावर पोट असणारे नागरिक आहेत यांच्या वर जर अन्याय होत असेल ते कदापि सहन करणार नाही . विषयी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे जाण्याचा इशारा दिले.
यावेळी सिटू चे राज्य सचिव कॉ. युसुफ शेख मेजर, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, माजी नगरसेविका शेवंता देशमुख,,दाऊद शेख, मोहन कोक्कुल,किशोर मेहता, शहाबुद्दीन शेख, अशोक बल्ला, जुबेर सगरी, दौला बागवान, शाम आडम, अँड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती.