शैक्षणिक प्रक्रियेत असताना युवकांनी आपल्या सुप्त गुणांना ओळखून भविष्याची वाटचाल करीत असतात विद्यार्थी दशेतच आपले उदिष्ट निश्चित करून मार्गक्रमण करावे असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जात पडताळणी समिती महेंद्र हरपाळकर यांनी केले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी व एम सी ई डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्गघाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.टी यशवंते, एस.आर.दाणे उपायुक्त जात पडताळणी तर प्रमुख पाहुणे यशस्वी उद्योजक मुकुंद भोगले यांनी उद्योगातील विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय अधिकारी डी.यु थावरे यांनी केले. सूत्रसंचालन भारती सोसे यांनी केले.
सीएसएमएस अभियांत्रिकी प्राचार्य,डॉ. यू बी शिंदे व विद्यापीठ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. मोहमद फारुकी खान उपस्थीत होते. कार्यक्रमाचे आभार बार्टी चे प्रकल्प अधिकारी योगेश सोनवणे यांनी केले. दोन महिने चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन बार्टी व एमसीईडी टीम प्रकल्प समन्वय प्रतिभा निमकर, रविकुमार कळसाईतकर,विद्या दाभाडे, सुषमा उके, मिनाशी जाधव, मोसिन पठाण, पुनम कुमावत, सुभाष राठोड, सेन्हलता मगरे, प्रियंका स्वामी, जयश्री भिसे, रविंद्र बारी, उमाकांत बोराडे, मनोहर अप्पार यांनी परिश्रम घेतले.