कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी येथील भौतिक सुविधा व विस्तारीकरण संदर्भामध्ये महानगरपालिका प्रशासन, आमदार सतेज पाटील, आमदार. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव यांनी आज भेट देऊन पाहणी केली.
गेल्या काही दिवसांपासून स्मशानभूमीतील भौतिक सुविधांबाबत नागरिकांनी निवेदने दिली होती. या पार्श्वभूमीवर आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी, येथील महापालिकेच्या ऑफिस शेजारील ९ गुंठे जागेमध्ये नवीन २४ बेड्चे स्मशानभूमी शेड उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १२ बेड्ससाठीचे शेड उभारण्यात येणार आहे. यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांच्या आमदार फंडातून प्रत्येकी ५० लाख असे १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, सध्याच्या शेड दुरुस्ती, स्मशानभूमी ते बुधवारपेठ पर्यंतचा रस्ता रुंदीकरण व सुशोभिकरण करणे, रस्त्यावर स्ट्रीट लाईट, स्मशान भूमीतील पाण्याचा निचरा, स्वच्छतागृह आदी सुविधांसाठी महानगरपालिकेकडून रु.१ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.
यावेळी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे सुनील मोदी, शारंगधर देशमूख, निलोफर आजरेकर, अनिल निकम, धनंजय सावंत, शशिकांत पाटील, अमित पाटील, शशिकांत भांदिगरे, दिग्विजय मगदूम, तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.