यवतमाळ: धारदार शस्त्रासह दगडाने प्रहार करून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना येथील दारव्हा मार्गावरील मोचन ढाब्याजवळ घडली. मृतक व मारेकरी अनोळखीच असल्याने या प्रकरणाचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. मृताची ओळख पटविण्यासाठी अवधूतवाडी पोलिसांनी परिसर पिंजून काढला. मात्र, त्यांना कोणताही धागा गवसला नाही.खून झालेला व्यक्ती 45 ते 50 वयोगटातील असून, चेहरा गोल, नाक चपटे,हात मनगटापासून वाकलेला, सडपातळ बांधा, रंग सावळा, अंगावर पांढर्या रंगाचे शर्ट, भुरकट रंगाची पँट आहे. ओळख पटविण्यासाठी अवधूतवाडी पोलिसांनी शोधपत्रिका जारी केली आहे. त्याच्या हातावर गजानन, संगीता असे नाव गोंदले आहे.
मृताची ओळख पटविण्यासाठी अवधूत वाडी पोलिसांकडून शोध पत्रिका जारी; दारव्हा रोडवरील खूनप्रकरणाचा उलगडा करण्याचे आव्हान
