सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आजचा सुशिक्षित तरुण कायम प्रयत्नशील असतो. त्यासाठी काहीजण इमाने-इतबारे अभ्यास करून मेहनतीने नोकरी मिळवितात पण काहीजण मात्र आर्थिक व्यवहार करून ‘शॉर्टकट’ मार्गाने सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रयत्नात मग त्यांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची आर्थिक फसवूक केली जाते. असाच एक प्रकार वाशिम मधील रिसोड तालुक्यातील ग्राम गोवर्धन येथील एका सुशिक्षित युवकासोबत घडला आहे. त्याची हकीकत अश्याप्रकारे आहे कि, ग्राम गोवर्धन येथील उद्धव सदाशिव तहकिक हे माजी सैनिक असून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून व साक्षीदार वैभव राऊत यांचेकडून यातील आरोपींनी लाखो रुपये घेत त्यांची फसवूक केली. सदर प्रकरणात आरोपींनी फिर्यादी उद्धव सदाशिव तहकिक यांच्याकडून १२,५०,०००/- रुपये व साक्षीदार वैभव राऊत यांचेकडून ५,२५,०००/- रुपये असे एकूण १७,७५,०००/- रुपये घेऊन फिर्यादी व साक्षीदारास सरकारी नोकरीचे खोटे व बनावट ओळखपत्र व सरकारी नोकरीची ऑर्डर देऊन फसवणूक केली. फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून पो.स्टे.शिरपूर येथे अप.क्र.२६०/२०२२, कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात आतापर्यंत एकूण ०५ आरोपी निष्पन्न झाले असून तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ०२ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम तर्फे तपासकामी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.सदर कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानीक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकाने केली आहे. नागरिकांनी पैसे घेऊन सरकारी नोकरी मिळवून देतो असे सांगणाऱ्या लोकांपासून दूर राहून स्वतःची आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
93 छात्राओं के खाते में राजस्थान सरकार ने भेजे 45 लाख रुपये, शिक्षा मंत्री ने दी बधाई
राजस्थान के शिक्षा मंत्री मदन दिलावर ने शुक्रवार को मुख्यमंत्री हमारी बेटी योजना एवं इंदिरा...
ঢকুৱাখনাত লখিমপুৰ জিলা শিৱ মন্দিৰ সমন্বয় সমিতিৰ পঞ্চদশ বাৰ্ষিক বিশ্বশান্তি শিৱ প্ৰাৰ্থনা সভাৰ প্ৰস্তুতি
ঢকুৱাখনা মহকুমাৰ অন্তৰ্গত মাতমৰা একৰীয়াত শ্ৰী শ্ৰী সাৰ্বজনীন শিৱ মন্দিৰ প্ৰাংগণত সদৌ লখিমপুৰ জিলা...
নুমলীগড়ৰ ধনশিৰি নৈত অঘটন।
নুমলীগড়ৰ ধনশিৰি নৈত অঘটন। নুমলীগড়ৰ মৰঙী চাহ বাগিচাৰ সমীপৰ ধনশিৰি নৈত পৰি নিখুজ এজন। নিখোজ হোৱা...
અજીબોગરીબ કિસ્સો : PUBG રમતા આ કપલને થયો પ્રેમ , ઘરેથી ભાગીને કર્યા લગ્ન
આજ સુધી તમે ઓનલાઈન ગેમિંગના કારણે બગડતા બાળકો અને ગુનાહિત ઘટનાઓ વિશે સાંભળ્યું જ હશે, પરંતુ આ...