पालम : आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीवर गंगाखेड पोलिसांनी खोटे गुन्हा दाखल केले आहेत. या खोट्या गुन्ह्याचा निषेध पालम तालुका राष्ट्रीय समाज पक्ष व गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला. शिवाय, या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांचे निलंबित करावे, अशी मागणी पालम तहसीलदारांकडे गुरुवारी (ता.१) निवेदनाद्वारे करण्यात आली.

गंगाखेड येथील शांतता समितीच्या बैठकीमध्ये आ. गुट्टे यांनी पोलीस प्रशासनाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याला सूचना दिल्या. परंतु पोलीस प्रशासनाने त्याचा वेगळा अर्थ काढून शब्दाचा विपर्यास केला. म्हणून डॉ. गुट्टे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. वास्तविक, अवैध धंदेवाल्याकडून पैसे घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची गरज आहे. उलटपक्षी सूचना करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या हक्कावर गदा आणला जात आहे. म्हणून पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी मित्रमंडळाचे प्रभारी माधव गायकवाड, तालुका अध्यक्ष बालासाहेब रोकडे, नारायण दुधाटे, नगरसेवक उबेदखा पठाण, शेख गौस, नगरसेवक अजीम पठाण, भगवान सिरस्कर, बाबासाहेब एंगडे, गणेश घोरपडे, सलमान खान पठाण, गणेश हतीअंबीरे, राहुल शिंदे, अजित शिंदे, माधन शिंदे, राजन भाळे, बालासाहेब फुलपगार, शेख आयुब, विशाल रोकडे, हनुमान रोकडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटोओळी : पालम येथील तहसीलदारांना मागणीचे निवेदन देताना मित्रमंडळाचे प्रभारी माधव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, नारायण दुधाटे यांच्यासह आदी.