औरंगाबाद:- दि.३०(दीपक परेराव) क्रांती चौकात येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिला बद्दल आक्षेपार्य विधान केल्याबद्दल त्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले व गुलाबराव पाटलांचा फोटोला शेन फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या सरकारचा पण जाहीर निषेध करण्यात आला, आणि गुलाबराव पाटलांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी मुख्यमंत्र्याकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती संभाजी ब्रिगेड जिल्हाप्रमुख रमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, राहुल भोसले, रेखा वाहाटूळे, शिवसेनेच्या शाखा सघंटक, सुकन्याताई भोसले, वैशालीताई खोपडे, रेणुका सोमवशी, रवि वाहाटूळे, योगेश सूर्यवंशी, तुषार जाधव, रामेश्वर कोलते, पंढरीनाथ काकडे, अजय शेंडगे, वैशाली पोतदार, सुवर्णा मोहिते, अण्णा बावसकर असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.