औरंगाबाद (आप्पासाहेब गोरे)कन्नड तालुक्यातील चिखलठाण येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेतील -1993 च्या वर्षात शिकत असलेल्या मुला-मुलींनी या आगोदर दिनांक 08/08/2021 रोजी तब्बल अठ्ठावीस वर्षांनी गेट टूगेदर घेतले आणि त्या नंतर रविवार रोजी परत ऐकदा एकत्र येऊन आठवणींना उजाळा दिला
वर्गमित्रांनी खास करुन औरंगाबाद, पुणे, सिल्लोड, वैजापूर, चिखलठाण कन्नड येथे राहत असलेल्या वर्गमित्रांनीच घडवून आणला यात तब्बल 73 विद्यार्थी- विद्यार्थीनी एकत्र आले होते. त्यांच्या या 29 वर्षाच्या जुन्या आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला एवढेच नाहीतर या धापळीच्या व धकधकीच्या व्यस्त जीवनात वेळात वेळ काढत एकत्र जमत हितगुज केले. त्यांच्या या हितगुजीने विद्यार्थी विद्यार्थीनी यांना गहिवरुन आले वर्गमित्र के श्री राजेंद्र तान्हाजी परसे, यांचे तीन महीन्यापूर्वी अचानक निधन झाल्यामुळे त्यांनाही सर्व वर्गमित्रानी भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण केली तसेच प्रत्येक जणांनी भुतकाळातील व सद्यापरिस्थतीतील अनेक सुख-दुःखाच्या गोष्ट एकमेकांना सांगितल्या विशेष म्हणजे सन 1993 च्या बॅचला एकुण 159 विद्यार्थी-विद्यार्थीनी पैकी 73 वर्गमित्र सदरील कार्यक्रमास आवजून हजर होते. या 73 वर्गमित्रा पैकी सर्वच वर्गमित्र शिक्षण क्षेत्रात सि.ए. क्षेत्रात, तसेच विविध क्षेत्रासह शेती, उद्दोजक, राजकीय या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत.
सन 1993 ही इयत्ता दहावीची बॅच जिल्हा परिषद हास्कूल चिखलठाण ता. कन्नड ही सदैव स्मरणात राहील अशीच आहे. जुन्या वर्गमित्रांची आठ्ठावीस एकोतीस वर्षानंतर पुन्हा एकदा धाग्यात गुंतले सर्वच औरंगाबाद, पुणे, सिल्लोड, वजापूर, तसेच चिखलठाण ता. कन्नड येथिल वर्गमित्रांच्या धडपडीतून पुन्हा सृष्टी अॅग्रो टूरिझम हॉटेल, जिकठाण फाटया जवळ औरंगाबाद-नगर रोड येथे एकत्र आले.
हे सर्व वर्गमित्र व्हॉटसॅपच्या माध्यमातून एकत्र आले. या पुढे ही सर्व वर्गमित्र एकमेकाच्या सुख दुःखात सहभागी होतील व एकमेकांना मदत करतील, तसेच तहयात अडीअडचणीच्या वेळी एकमेकाच्या मदतीसाठी धावून 'जाण्याचे सर्वमित्रांनी ठरवीले.