क्रीडा दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र युवा केंद्र, रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने वरसोली समुद्रकिनाऱ्यावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

        या स्पर्धांमध्ये गोळा फेक, 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, लांब उडी अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनास ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड.डॉ.निहा अनिस राऊत, ॲड.कला ताई पाटील- सेन्टेनियस लायन्स क्लब ऑफ श्रीबाग प्रेसिडेंट, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमी च्या संचालिका सुचिता साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.    

       या स्पर्धेत युवक- युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.