रिद्धी-सिद्धीचे दैवत , विघ्नहर्त्या श्री .गणरायाचे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झाले. अमरावतीच्या आमदार सुलभाताई संजय खोडके यांच्या अमरावती शहरातील गाडगेनगर येथे घरी श्री .गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली असून आमदार महोदयांनी विघ्नहर्त्या बाप्पांची आरती करून सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी तसेच सर्वत्र सुख -समृद्धी नांदण्यासाठी मनोकामना केली. जीवनात नवं चैतन्य, नवं प्रेरणा, नवी उम्मीद घेऊन हा गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे समस्त नागरिकांचे आरोग्य निरोगी राहो, धनलाभ -भरभराटी नांदो, सुख-समृद्धी लाभो, विद्येचा प्रसार होऊन ज्ञानाचा सुगंध दरवळत राहो, सर्वांना सुयश, कीर्ती व प्रतिष्ठा प्राप्त होवो, अशी मनोकामना करीत आमदार सुलभाताई खोडके यांनी समस्त नागरिकांना श्री. गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत कोरोनाचा काळ अत्यंत दुःखद होता, दरम्यान अतिवृष्टी व नापिकीने शेतकऱ्यांना बेहाल केले, मजूर व श्रमिक वर्गाला सुद्धा हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. या सर्व परिस्थितीला मोठ्या हिमतीने व धैर्याने सामोरे जाऊन आज प्रत्येक नागरिक आपल्या जीवनाचा डोलारा नव्याने उभ्या करून ही विस्कटलेली स्थिती आता पूर्वपदावर आणतांना दिसत आहे. या विधायक कार्यात प्रत्येकाला नव्या जोमाने काम करण्याची शक्ती मिळो, शेतकऱ्यांच्या घरी भरभराटी नांदू दे , महिला सक्षमीकरण, युवा विकास, सामाजिक सुधारणा घडून प्रत्येक क्षेत्राला समृद्धी मिळू दे , असे श्री. गणरायाला साकडे घालीत आमदार सुलभाताई खोडके यांनी मानवी कल्याणासाठी व सर्वत्र सुख -समृद्धी नांदण्यासाठी मनोकामना केली.