राज्यात सध्या अहमदनगर, जळगाव, धुळे व अकोला या जिल्हयात पाळीव जनावरांना लम्पी स्किन डिसीस रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सध्या या रोगाचा प्रादुर्भाव नसला तरी पुढील आवश्यक उपाययोजना व शेतकऱ्यांनी त्यांच्या पशुधनाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. लम्पी स्किन रोग हा गोट पॉक्स विषाणु (देवी) लम्पी स्किन रोग विषाणुमुळे गायवर्ग व म्हैसवर्ग जनावरामध्ये होते.या रोगाची लक्षणे- सुरुवातीचे २-३ दिवस हलका ताप येतो त्यानंतर जनावराच्या कातडीवर साधारणत: २-५ सेमी आकाराच्या घट्ट गाठी येतात. याशिवाय काही बाधित जनावरांच्या तोंडामध्ये, श्वसन नलिकेमध्ये, घशामध्ये गाठी येतात. दुध देण्याचे प्रमाण कमी होते. अशी लक्षणे गावातील पाळीव जनावरांना दिसुन आल्यास सचिवांमार्फत तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना तसेच गट विकास अधिकारी व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. लम्पी स्किन रोगाचा प्रसार माशा, गोचिड, डास व पिसवा इत्यादीपासुन होतो. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता जनावरांच्या गोठयात २० टक्के इथर व क्लोरोफार्म, १ टक्के फॉर्मलिन, २ टक्के फिनॉल (१५ मिनिटे), आयोडीन जंतनाशके १:३ प्रमाणात पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करण्यात यावी. आजारी जनावरांवर नजीकच्या पशुवैद्यकाकडून औषधोपचार करुन घ्यावे. अजारी जनावरांना तात्काळ इतर निरोगी जनावरापासुन वेगळे ठेवावे. लम्पी स्किन डिसीस रोगाची लस उपलब्ध झाल्यावर जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती डॉ. शाम गाभणे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्हि.एन.वानखडे यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
रत्नागिरी जांभरुण मार्गावर दुचाकीच्या अपघातात महिला जखमी, तरुणावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : कोतवडे ते जांभरुण मार्गावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात महिला जखमी झाली असून अपघात...
Monsoon Session: विभिन्न हाई कोर्ट में 30 वर्षों से अधिक पुराने 71,204 मामले लंबित- कानून मंत्री
नई दिल्ली, सरकार ने लोकसभा को शुक्रवार को बताया गया कि विभिन्न हाई कोर्ट में 30 साल से अधिक...
આજથી કોંગ્રેસમાં ચૂંટણી લડવા ઇચ્છુક ઉમેદવારોના ઇન્ટરવ્યૂ શરૂ
ગુજરાત વિધાનસભાની ચૂંટણી નજીક છે ત્યારે કોંગ્રેસ દ્વારા ચૂંટણી લડવા ઇચ્છુક બાયોડેટા આપનાર અને...
राजकीय जिला आयुर्वेद चिकित्सालय में मौसमी बिमारियों को लेकर इम्यूनिटी महाभियान की शुरुआत हुई।
आज दुर्गाष्टमी के अवसर पर बालचंदपाडा स्थित राजकीय जिला आयुर्वेद चिकित्सालय में मौसमी बिमारियों...