आयडियल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, महाराष्ट्र माध्यमिक शाळा,अकोला येथून प्रथम

अकोला: स्थानिक टेलिफोन कॉलनी मधील रहिवाशी कुमारी सायली संजय बावणे हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिने आयडियल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, महाराष्ट्र माध्यमिक शाळा,अकोला या आपल्या शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला असून अकोला जिल्ह्यातून पाचवा क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या शाळेतील एकूण परीक्षार्थींपैकी

19 विद्यार्थी उत्तीर्ण पैकी 9 शिष्यवृत्तीस पात्र झाले आहे.

        NMMS परीक्षा म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना होय.सन 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS ) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मॉर्फत राबविली जात आहे . आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना , तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे . प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते . सदर शिष्यवृत्ती 12 वी पर्यंत मिळते . सन 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु 1000/-( वार्षिक रु . 12,000 / - ) असुन गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते .

         कुमारी सायली बावणे हिने अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत सदर परीक्षेत यश संपादन केले आहे. तिचे वडील छोटा व्यवसाय करून कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करतात त्यात आईकडूनही शिवणकाम करून कुटुंबाला आधार दिला जातो. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चित करण्यासाठी व उभ्या आयुष्यात त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने, चिकाटीने,परिस्थितीला हार न मानता यश संपादन केले असून कुमारी सायली कडून विद्यार्थ्यांना प्रेरणा घेणे आवश्यक आहे. तिने मिळवलेल्या यशाचे कौतुक संपूर्ण जिल्हाभर होत आहे. सायलीने आपल्या यशाचे श्रेय वडील संजय बावणे व आई नलिनी बावणे यांच्यासह तिचे शिक्षक आनंद साधू सर यांना दिले आहे.