शेतीच्या वादातून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या .गेवराई बाशी ची घटना.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
मयताच्या खिशात आढळली . पोलीस आणि महसूल च्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक मजकूर असलेली चिठ्ठी.
पैठण तालुक्यातील गेवराई बाशी येथील शेतकरी शेषराव सोमाजी खुटेकर यांनी आज बुधवारी सकाळी सहा च्या दरम्यान आपल्या राहत्या घराच्या छताला दोरखंडाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि या दुर्घटने नंतर शवविच्छेदन साठी प्रेत खाली घेऊन इस्पितळात दाखल करण्यात आले तेव्हा मयताच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली त्यात आपण एम आय डी सी च्या पोलीस अधिकारी व पैठण तहसीलच्या अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे त्यामुळे माझ्या आत्महत्या ला हेच जबाबदार आहेत असा खळबळजनक मजकूर लिहिला आहे
आज सकाळी मयताचा मुलगा अरुण शेषराव खुटेकर यांनी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या केवळ शेतीच्या वादातून झाली असून यास जबाबदार तथाकथित आरोपी भाऊसाहेब खुटेकर, बन्शी खुटेकर, मच्छिंद्र खुटेकर, मनोज खुटेकर, अशोक खुटेकर, दिपक खुटेकर, रविंद्र खुटेकर या सात पुरुष आरोपी सह अन्य पाच महीला आरोपी आहेत आणि या आरोपींना अटक केल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेण्यास तयार नाही अशी भूमिका घेतली. आठ तास मयताचे शवागारात पडुन होते याच दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ विशाल नेहुल आणि स पो निरिक्षक भागवत नागरगोजे यांनी समझोता घालून परिस्थिती नियंत्रणात आणली. आणि पोलीस बंदोबस्तात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी स पोलीस निरीक्षक दिलीप पाटील चौरे व राउत यांनी चोख कामगिरी बजावली. पुढील तपास औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे अधिकारी नागरगोजे, चौरे राऊत हे करीत आहेत.