भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा निहाय निवड प्रक्रिया आता मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार असल्याची माहिती नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज येथे दिली. 'अग्निवीर ' अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुल हे योग्य स्थळ असून याच ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा व अन्य व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना आज त्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दिल्या. मानकापूर जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी आज दिलेल्या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सैन्य भरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल जगतनारायण, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे विभागीय उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
BHEL Shares To Fall Today?: आज गिरने वाला है ये Stock? आपके मुनाफे को कैसे रखें Safe? |Business News
BHEL Shares To Fall Today?: आज गिरने वाला है ये Stock? आपके मुनाफे को कैसे रखें Safe? |Business News
Kahani Kursi Ki: NDA का विस्तार...Chirag Paswan से बात...Jayant Rajbhar भी आ रहे साथ? | PM Modi
Kahani Kursi Ki: NDA का विस्तार...Chirag Paswan से बात...Jayant Rajbhar भी आ रहे साथ? | PM Modi
કમા ભાઈ શહેર ના મહેમાન બન્યા વિકલાંગો સાથે ગરબે ઘૂમ્યા
કમા ભાઈ શહેર ના મહેમાન બન્યા વિકલાંગો સાથે ગરબે ઘૂમ્યા
शहीद नायक सुरेश चित्ते स्मृतिदिनानिमित्त आलमला येथे ५२ जणांचे रक्तदान
शहीद नायक सुरेश चित्ते स्मृतीदिनामित्त आलमला येथे 52 जणांचे रक्तदान
औसा प्रतिनिधी : औसा...