राज्यात अतिशय उत्साहात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाला बुधवार (दि. ३१) पासून सुरुवात होत आहे. विशेषत: पुणे जिल्हा हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणारा जिल्हा असल्याने सर्वत्र गणेशोत्सवाची धूम बघायला मिळत आहे. घराघरांत चैतन्याचे वातावरण पसरले असून सार्वजनिक मंडळेदेखील आता सजली आहेत.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बुधवारी गणेशोत्सवाचा पहिला दिवस. ढोल-ताशांच्या गजरात सार्वजनिक मंडळे आपली गणेशमूर्ती वाजत-गाजत नेण्यासाठी तयार झाले आहेत. तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सवकरण्यात साध्या पद्धतीने करण्यात आला होता. यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध हटविल्यामुळे तरुणाईमध्ये नवचैतन्य सळसळले आहे. परिणामी मोठ्या धूमधडाक्यात हा गणेशोत्सव साजरा होत आहे. सजावटीसाठी लागणारे साहित्य आता घरोघरी पोहोचले असून घरेदेखील महिला व बालगोपाळांनी विशेषत: अनेक मुला मुलींनी स्वतः शाडू माती आणून गणपती बनविले असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश ते यातून देत आहेत. यासह जिल्ह्यातील बाजारपेठेत गणेशोत्सवात मोठी उलाढाल झाल्याचे पहावयास मिळत आहे.