भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार पुरस्कृत 'स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय ' या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्वच्छ आणि सुंदर विद्यालय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पुणे जिल्ह्यातून वाघोली, ता. हवेली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयास स्वच्छ व सुंदर विद्यालय, जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच विद्यालयाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी दिली.

सदर पुरस्काराचे वितरण पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह पुणे येथे संपन्न झाले . पुरस्कारासाठी विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. तर विद्यालयातील संदीप लोणकर, क्षीरसागर सर, पल्लवी डोके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.