सोलापूर - यशवंतपूर - बागलकोट एक्स्प्रेस मध्ये चोरी करणाऱ्या एका तरुणाला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे . शिवानंद शरणबसप्पा गरड ( गुलबर्गा ) याला अटक झाली आहे . ६ डिसेंबर २०२१ रोजी एस ४ या डब्यातून प्रवास करताना श्रेया श्रीकृष्ण जहागीरदार यांची बॅग चोरीला गेली होती . मोबाइल , लॅपटॉप व महत्त्वाची कागदपत्रे त्यामध्ये होती . सोलापूर स्थानकावर हा प्रकार समोर आला होता.
सोलापूर लोहमार्ग पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला होता . पथकाने गुलबर्गा येथून संशयिताला अटक केली आहे . या गुन्ह्यातील मोबाइल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे . संशयित आरोपी शिवानंद गरड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे . कर्नाटक रेल्वे पोलिसात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत .