परळी , आम्हाला वर्षभर शाळेत कमी आणि शाळेच्या बाहेर शाळाबाह्य कामे सतत लावली जातात यामुळे आमच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असते तरी आम्ही विद्यार्थ्यांना आमचे सर्वस्व पणाला लावून शिकवत असतो. शासनाने यापुढे आम्हाला फक्त आमच्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी वेळ द्यावा इतर शाळाबाह्य कामे लावू नयेत यासाठी आता राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक रस्त्यावर उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. आणि याची सुरुवात परळी तालुक्यात सहा सप्टेंबर रोजी भव्य मोर्चाद्वारे होणार आहे.              

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

      सर्व शाळाबाह्य काम कमी करुन फक्त आम्हाला_शिकवू_द्या" यासाठी तसेच जिल्हा परिषद शाळा व शिक्षक यांना ऐनकेन प्रकारे बदनाम करण्याचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी आज दिनांक 30/08/2022 रोजी आढावा बैठकीला सर्व शिक्षक संघटनाचे प्रमुख उपस्थित राहिले व अतिशय उत्साहात बैठक संपन्न झाली.

   या बैठकीमध्ये दिनांक 06/09/2022 रोजी तहसील कार्यालयामार्फत मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री,मा.शिक्षणमंत्री या सर्वांना निवेदन द्यायचे ठरले.

  त्यासाठी दिनांक 06/09/2022 रोजी ठीक 04 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी एकत्र जमून सर्व मिळून तहसील या ठिकाणी जायचे व सर्वांनी एकत्रित रित्या निवेदन द्यायचे असे ठरलेले आहे.

    त्यासाठी सर्व केंद्रातील शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे ठरले आहे. सर्व शिक्षक बांधवांनी यासाठी आपली स्वाक्षरी करून उभारण्यात येणाऱ्या लढ्याला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येते.

   तसेच शक्य झाल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा लवकरच मोठे आंदोलन उभे करण्याचे ठरलेले आहे. यासाठी परळी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी जोरदार स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे दरम्यान परळी तालुक्यातील शिक्षकांचे हे आंदोलन महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी एक दिशा ठरणार असेच दिसत आहे.