उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २६ ऑगस्ट रोजी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ३१ ऑगस्टपासून सुरु होणारा गणेशोत्सव राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार देण्यासाठी निवड करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.  स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना, शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये आहे. राज्य शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in., पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांचे संकेतस्थळ www.pldeshandekalaacademy.org व दर्शनिका विभागाचे संकेतस्थळ http://mahagazetteers.com वरही उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज व सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर २ सप्टेंबर २०२२ पूर्वी ऑनलाईन पाठवावेत. जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय निवड समिती गणेशोत्सव उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देतील. व्हिडीओ व आवश्यक कागदपत्र गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त करुन घेतील. ही समिती प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत शासन निर्णयातील तक्त्यानुसार गुणांकन करून त्यातील एक उत्कृष्ठ गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांच्या संबंधित कागदपत्रे, व्हिडीओ व गुणांकन राज्य समितीकडे १३ सप्टेंबरपर्यंत सादर करतील. याकरीता संदर्भीय शासन निर्णयात नमुद बाब जिल्हयातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे निदर्शनास आणुन देण्यात येत आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं