परळी (प्रतिनीधी)
परळी तालुक्यात पावसाने मागील पंधरा दिवसापासुन दडी मारल्याने कापुस,सोयाबिन,मुग,उडीद ही खरीपातील पिके वाळत असुन शेतकरी संकटात सापडला आहे.या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी करुन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद कराड यांनी तहसिलदार परळी यांना निवेदन दिले.
यावर्षीच्या पावसाळ्यात सुरूवातीला परळी तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकर्यांनी वेळेवर पेरणी केली.त्यानंतर सततच्या पावसाने कापुस,सोयाबिन,मुग,उडीद,तुर या पिकांची वाढ खुंटली.सध्या सोयाबिन शेंगा भरण्याच्या तर कापुस बोंडे लागण्याच्या स्थितीत असताना मागील पंधरा दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने ही पिके वाळत आहेत.शेतकर्यांनी या पिकासाठी खते,फवारणी,खुरपनी यावर केलेला खर्च वाया जाण्याची भिती असुन या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी तहसिलदार परळी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड,शहराध्यक्ष सय्यद सिराज,शहरउपाध्यक्ष अमित केंद्रे,युवा नेते राजेश फड,अमर रोडे,गणेश सुरवसे,अभि गीते,श्याम कराड,तोफिक कच्ची,मोईन काकर,
बिलाल शेख,आकाश रोडे,दीपक मुरकुटे,अतुल मुंडे,रंजीत कदम,लिंबाजी दहिफळे,भगवान सातभाई,निकेश बनसोडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.