जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किन्हिराजा येथे अज्ञात चोरट्यांनी एकच राञी वेगवेगळ्या चार ठिकाणी चोरी करुन पोलिसांना आव्हाण दिल्याची घटना 29 आॅगष्ट रोजी मध्यराञी घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी स्वानपथकास पाचारण केले.जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किन्ही राजा येथिल पोलिस चौकीच्या पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रभाग एक मधिल निलेश सरदार यांच्या राहत्या घराच्या पाठी मागील बाजुस असलेल्या रुम चा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.व घरातिल तीन कपाट व एक लाकडी पेटी फोडली.माञ याच वेळी निलेश सरदार याला जाग आली. हे चोरट्याच्या लक्षात येत्या त्यांनी तेथुन पळ काढला माञ त्यांच्या हाती काहीच लागले नाही.या नंतर चोरट्यानी आपला मोर्चा प्रभाग एक मध्ये मुख्य चौकात असलेल्या नवदूर्गा माता मंदिराकडे वळविला या मंदिराची दान पेटी फोडून त्या मधिल हजारो रुपये पळविले.त्यां नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्रभाग पाचमधिल शंकर आप्पाराव घुगे यांच्या किराणा दुकाणाकडे वळविला दूकानचे कुलूप तोडून दूकानात प्रवेश केला व दूकाना मधिल गल्लापेटीतिल नोटा, चिल्लर नाणी,व दूकानातिल चहापत्ती चे पाकिटे, उंटछाप बीडी व शेरछाप बिडीचे पाकिट,खोबरेल तेलाच्या बाॅटल,कापड धुण्याची साबन व पावडर तसेस अंघोळीच्या साबन,बर्तनबार,शेंगदाणे, मेहूल छाप तंबाखूचे पाकीटे असा अनेक किराणा माल सोबत घेऊन पोबारा केला.त्या नंतर चोरट्यानी आपला मोर्चा याच प्रभागामधिल बाबुराव निलकंठ तायडे यांचे घराकडे वळविला व त्यांच्या घरा समोर ऊभी असलेली MH 37 H 9265 या क्रंमाकाची दूचाकी पळवुन पसार झाले होते, सदर मोटरसायकल घटनास्थळापासून एक किलोमीटरच्या आत पोलिसांना बेवारस आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.जऊळका पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेनदिवस चोर्याचे व हाणामार्याचे प्रमाण वाढले असुन वकिल व पोलिस कर्मचार्याच्या घरी झालेल्या चोरी मुळे गावात भितीचे वातावर पसरले आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं