भारतीय जनता पक्षाचा सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहीचे पत्र जाहीर केले आहे. 

भारतीय जनता पार्टीचे माजी सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेने फसवणूक केल्याप्रकरणी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे श्रीकांत देशमुख यांना राजीनामा देणे भाग पडले होते. श्रीकांत देशमुख यांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात राजीनामा दिला. होतो भारतीय जनता पार्टी कडून स्वीकारण्यात देखील आला. त्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांचाकडे सोपवण्यात आला होता.   

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे शांत, संयमी व अभ्यासू आहेत. तसेच त्यांना सामाजिक व राजकीय अनुभव दांडगा आहे. याच अनुभवाचा उपयोग पक्ष संघटनेच्या कार्यवाढीसाठी होईल. असा विश्वास देखील पत्राद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.