पाथरी (वार्ताहार) विद्यार्थी प्रगती साधण्यासाठी शाळेतील शिक्षकांसोबतच पालकांनी ही शैक्षणीक प्रक्रियेमध्ये सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.भावनाताई अनिलराव नखाते यांनी केले. संस्थेच्या शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ,ता - पाथरी येथे मंगळवार दिनांक: 30 Aug 2022. रोजि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या अध्यक्षीय स्थानावर बोलत होत्या. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर घेण्यात आलेल्या विज्ञान, गणित व इंग्रजी तसेच सामान्यज्ञान ऑलम्पियाड परिक्षेमध्ये सुवर्ण, रजत व तांब्र पदके तसेच प्रोत्साहन पद प्रमाणपत्र आणि शिष्यवर्ती धारक झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून गजानन घुमरे, प्रदिप कुमार नवघरे , स्वरूपाताई कसबकर व मुक्ताबाई अत्रे शाळेचे मुख्याध्यापक यादव N.E प्राचार्य डहाळे k.N आदी उपस्थित होते - मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांना पारितोषिक वितरित करण्यात आले.

उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण B.M यांनी तर आभार प्रदर्शन गजमल A.K यांनी केले.

कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.