परभणी/प्रतिनिधी:-विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवून अभ्यास केला तर प्रशासकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत असे मत उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांनी व्यक्त केले.
येथील शारदा महाविद्यालयात बी. ए., बी. एस्सी., बी. कॉम., बी. सी. ए. व एम. ए. झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवी वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी दाभाडे बोलत होत्या. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.रमेश भालेराव उपस्थित होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.वसंत भोसले उपस्थित होते. तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.श्यामसुंदर वाघमारे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ.काझी कलिमोद्दीन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.संतोष नाकडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा सचिन खडके, क्रीडा प्रमुख प्रा. शाम पाठक, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.ज्ञानोबा मुंढे, विद्यार्थी संसद मार्गदर्शक प्रा डॉ सौ स्वाती कुलकर्णी, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा डॉ रत्नाकर कांबळे, मानसशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. एन. व्हीं. सिंगापूरे व डॉ. जी. जे. पेदापल्ली उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे म्हणाल्या की, कोणत्याही शाखेच्या पदवीधरांना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी असून विद्यार्थ्यांनी पारंपरिक क्षेत्राबरोबरच राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या परीक्षा सातत्याने होत असतात त्यात पूर्णपणे झोकून देऊन अभ्यास केला तर यश नक्कीच मिळेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवून अभ्यास केला तर प्रशासकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत असे मत उपजिल्हाधिकारी दाभाडे यांनी व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्य डॉ वसंत भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा सविस्तर आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी डोळसपणे वाटचाल करावी असे मत प्रतिपादन केले.
तत्पूर्वी शासनाने व विद्यापीठाने निर्गमित केलेल्या नियमानुसार पदवी वितरण समारंभाची सुरूवात व सांगता मिरवणुकीने झाली.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सर्व स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ नवनाथ सिंगापूरे , प्रास्ताविक प्रा डॉ सुरेश खिस्ते यांनी तर आभार प्रदर्शन प्रा डॉ काझी कलिमोद्दिन यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश जयपूरकर, राजाराम मुत्रटकर, भगवान रिठाड , तुकाराम पवार, राजकुमार नागुल्ला, जावेद शेख,राजू नरवाडे, कु. तनुजा रासवे, श्रीमती सुनंदा राजगुरू, श्रीमती लीलाबाई गायकवाड यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक यांनी प्रयत्न केले.