शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप ता. शिरूर चौफुला येथील रस्ता दुभाजक धोकादायक झालेला असल्याने वाहन चालकांना वाहनाचा अंदाज येत नसल्याने वाहने दुभाजकावर जात असून अनेक अपघात होऊ लागल्याने येथील धोकादायक दुभाजक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे.

                  शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप चौफुला रस्त्यावर चौफुला येथे रस्ता दुभाजक बनविण्यात आलेला आहे. मात्र येथील दुभाजक मुळे चाकण व शिक्रापुर रस्त्याने रात्रीच्या सुमारास येणाऱ्या वाहनांना दुभाजकचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत आहे, त्यामुळे या ठिकाणी नियमीत सुरू असणारा सिग्नल बसवण्यात यावा अशी मागणी जिल्हा परीषद सदस्या सविता बगाटे, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, माजी सभापती प्रकाश पवार, शंकर जांभळकर, माजी सदस्य भगवान शेळके यांसह येथील नागरिकांनी केली आहे. यापूर्वी सदर रस्ता वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर होता मात्र सध्या शासकीय स्तरावर याची देखभाल करण्यात येत आहे. सदर ठिकाणी वारंवार होत असलेले अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन येथे ठिकाणी सिग्नल बसवावा अशी मागणी होत असताना देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे.