परळी (प्रतिनिधी ) गेवराई शहरातून जात आसलेला बायपास टू बायपास हा रस्ता मुख्य असुन या रस्ताची मागिल काही वर्षांपासून अंत्यत बिकट अवस्था झाली होती.या रस्त्यावर दुभाजक करावा,रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी,विविध ठिकाणी गतिरोधक उभारुण मार्गावरील चौकांचे सुशोभिकरण करण करण्यात यावे यासाठी धम्मपाल कांडेकर हे मागिल १४ वर्षांपासून शासन स्तरावर लढा देत आहे.सध्या या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असुन अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कोट्यावधी रुपये खर्च करून होत असलेले काम दर्जेदार करण्यात यावे,या कामा बरोबरच आ.लक्ष्मण पवार यांनी जातीने लक्ष घालून रस्ता दुभाजक करण्यासाठी संबंधितांना सुचना द्याव्यात,मुख्य व वर्दळीचा हा रस्ता आसल्याने नगर परिषदेकडून या मार्गावरिल मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून सिग्नल व्यवस्था करावी.

     सध्या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामा बरोबरच रस्ता दुभाजकाचे अत्ताच काम सुरु केल्यास शहराच्या वैभवात आणखी भर पडेल अशी मागणी धम्मपाल कांडेकर यांनी यावेळी केली.दरम्यान आ.लक्ष्मण पवार हे विकास कामांना प्राधान्य देत आसल्याने त्यांनीच आता लक्ष घालून या मार्गावर रस्ता दुभाजकाचे काम सुरु करण्यास संबधितांना भाग पाडून काम करतील असे गेवराई शहरातील हजारो नागरिक,व्यापारी व वाहनधारकांतून बोलले जात आहे.

        गेवराई शहराच्या मध्यभागातून पुर्वी धुळे-सोलापूर हा वर्दळीचा जात होता.आता बाह्यवळण रस्ता झाल्याने शहरातील बायपास टू बायपास रस्त्याची वाट लागली आहे.मागिल १४ वर्षांपासून या मार्गावर गतिरोधक उभारण्यात यावे,रस्ता दुभाजक करण्यात यावा,रस्ता चौपदरीकरण,मुख्य चौकात सिग्नल व चौकांचे सुशोभिकरण करण्यात यावे आदि मागण्यासाठी गेवराई शहरातील युवा कार्यकर्ते धम्मपाल कांडेकर हे शासन स्तरावर आपला लढा लढवित आहे.

     यासाठी अंदोलन,निवेदने,पाठपुरावा,जनजागृती आदिसाठी त्यांचे मोलाचे काम गेवराईकरांसाठी होत आहे.१४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर धम्मपाल कांडेकर यांच्या अंदोलनाना आता यश आल्याचे गेवराईकरातून बोलले जात आहे.आ.लक्ष्मण पवार यांनी या रस्त्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ केला आहे.जवळपास ८ कोटी रुपये या रस्ता कामासाठी खर्च होत आहे.अनेक वर्षानंतर हे काम सुरु झाले असुन पुन्हा अनेक वर्षानंतर हे होऊ शकत नाही.यासाठी या रस्त्याचे काम दर्जेदार होणे आवश्यक आहे,महत्वाच्या चौकात रस्ता दुभाजक,बायपास टू बायपास रस्त्यावर रस्ता दुभाजक,सिग्नल यंञणा व चौकांचे सुशोभिकरण होणे आता आवश्यक आसल्याचे धम्मपाल कांडेकर यांनी मागणी केली आहे.दरम्यान सध्या सुरु असलेल्या कामा बरोबरच आ.पवार यांनी जातीने लक्ष घालून रस्ता दुभाजक काम करण्यास संबधितांना भाग पाडावे अशी मागणी वाहतुकीच्या कोंडीने हमखास ञस्त झालेल्या वाहनधारक,व्यापारी व नागरिकांमधून होऊ लागली आहे.

       दरम्यान वरिल काम हे खुप वर्षानंतर होत आहे शिवाय हे काम झाल्यानंतर पुन्हा लवकर होणार नाही.यासाठी हे काम दर्जेदार होऊन रस्ता दुभाजक होणे आवश्यक आहे.ठिकठिकाणी गतिरोधक,चौकाचे सुशोभिकरण व मुख्य चौकात सिग्नल व्यवस्था होणे देखील आवश्यक आहे.साप आणि मुंगूस यांचा ३६ चा आकडा आहे त्याच प्रमाणे डांबर व पाण्याचा आहे.अशातच हे काम पावसाळ्यात सुरु झाल्याने संबधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.नसता कोट्यावधी रुपये पाण्यात गेले अशी म्हणण्याची वेळ गेवराईकरांवर येऊ नये यासाठी संबंधित प्रशासनाने हे काम दर्जेदार करणे आवश्यक झाले आहे.मागिल १४ वर्षांपासून या रस्त्याचे काम व्हावे यासाठी मी लढा दिला असुन शासन पातळीवर पाठपुरावा केला आहे.यासाठी हे काम दर्जेदार व्हावे,सध्या काम सुरु झाल्याने या कामा बरोबरच रस्ता दुभाजकाचे देखील काम होणे आवश्यक आहे.काम संपल्यानंतर पुन्हा रस्ता दुभाजकाचे काम लवकर होणार नाही.यासाठी तत्काळ रस्ता दुभाजकाचे काम सुरु करावे अशी मागणी पॅन्थरचे प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी केली आहे.