पाण्याची पातळी वाढविण्यासोबतच जलसंवर्धनाची कामे करतांना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला पाहिजे. यंत्रणांना जलशक्ती अभियानांतर्गत कॅच द रेन मोहिमेच्या कामांचे उदिष्ट दिले आहे, हे उदिष्ट यंत्रणांनी सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत पुर्ण करावे. असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले. आज 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानांतर्गत कॅच द रेन मोहिमेचा आढावा घेतांना श्रीमती पंत बोलत होत्या. सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, जिल्हा परिषेदच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर. वानखेडे, जिल्हा भुजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भुवैज्ञानिक श्री. कडू, प्रभारी उपवनसंरक्षक विपुल राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश राठोड व सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी अपुर्वा नानोदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती पंत म्हणाल्या, संबंधित यंत्रणांनी या मोहिमेच्या केलेल्या कामांचे छायाचित्रे संबंधित संकेतस्थळावर अपलोड करावी. नियोजनातून या मोहिमेची कामे निर्धारीत वेळेत पुर्ण करावी. राज्यात वाशिम जिल्हा कॅच द रेन मोहिमेत प्रथम स्थानावर आहे. हेच स्थान कायम राहावे यासाठी दिलेले उदिष्ट वेळेत पुर्ण करावे. काही यंत्रणांना संकेतस्थळावर केलेल्या कामांचे छायाचित्रे अपलोड करतांना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे मृद व जलसंधारण विभागाने संबंधित विभागांच्या तसेच पंचायत समित्यांच्या ऑपरेटरची एकदिवशीय कार्यशाळा तात्काळ घेऊन येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवाव्यात असे श्रीमती पंत यावेळी म्हणाल्या. विविध यंत्रणांनी 1 लक्ष 29 हजार 476 कामे आणि 7 लक्ष 19 हजार 810 वृक्षलागवडीची कामे अशी एकूण 8 लक्ष 49 हजार 286 कामे या मोहिमेअंतर्गत केली असल्याची माहिती श्रीमती नानोटकर यांनी दिली. विविध यंत्रणांनी जलसंवर्धनाची आणि पावसाच्या पाण्याच्या संकलनाची 2100 कामे पुर्ण केली आहे. 358 कामे प्रगतीपथावर आहे. पारंपारीक पाणी साठवणूकीच्या तलावांच्या दुरुस्तींची 571 कामे, शोषखड्डयांची 2092 कामे, रिचार्ज स्ट्रक्चर दूरुस्तीची 2348 कामे आणि वॉटरशेडची 160 कामे यासह एकूण 1 लक्ष 29 हजार 476 कामे करण्यात आले असल्याचे श्रीमती नानोटकर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेअंतर्गत विविध बाबींवर केलेल्या कामांची माहिती दिली. सभेला सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी आणि काही नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जिल्यात ओला दुष्काळ जाहीर करा माजी आमदार डॉ नामदेवराव ऊसेन्डी
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा- मा.आमदार डॉ नामदेवराव उसेंडी
कोनसरी, आष्टी, चदनखेडी,...
नव नियुक्त नगर परिषद सभापति आज करेगी पदभार ग्रहण
बूंदी नगर परिषद सभापति सरोज अग्रवाल आज करेंगी पदभार ग्रहण, नगर परिषद में दोपहर 12:15 से 1:00 के...
শিৱসাগৰ নগৰত ডাক বিভাগৰ বিভিন্ন আঁচনিৰ সন্দৰ্ভত জনসাধাৰণক অৱগত কৰাৰ উদ্দেশ্যে অনুষ্ঠিত সভা।
বুধবাৰে শিৱসাগৰ নগৰৰ মাজ মজিয়াত অৱস্থিত জিলা পৰিষদৰ কাৰ্য্যালয়ৰ প্ৰেক্ষাগৃহত। ডাক পৰিদৰ্শক অপূৰ্ব...
MCN NEWS| अब्दुल सत्तार पाया पडला म्हणून निवडून आला-चंद्रकांत खैरे
MCN NEWS| अब्दुल सत्तार पाया पडला म्हणून निवडून आला-चंद्रकांत खैरे