परळी,( आप्पासाहेब गोरे):-

परळी तालुक्यातील मोजे पांगरी येथून एका अपे ऑटो रिक्षा चोरी झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली करत दि. 24 रोजी पांगरी येथून एक व दि. 27 रोजी नेकनूर येथून एकाच अटक करण्यात आली आहे.

   याबाबत पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 202/2022 दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी कलम 379 ऑटो चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अशोक हनुमान मुंडे, रा. पांगरी व मारुती रोमन रा. नेकनूर जिल्हा बीड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.ही कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पीएसआय झांबरे पोलीस हवालदार रमेश तोटेवाड पोलीस नाईक रामचंद्र केकान पोलीस शिपाई बंटी यरडलावार यांनी केली.