यवतमाळ : यंदा चांगला पाऊस झाला असून, प्रकल्प भरले आहे. तरीदेखील शहरात नियमित पाणीपुरवठा केला जात नाही. या संदर्भात जिवन प्राधीकरण विभागाच्या अधिकार्‍यांना विचारणा केल्यास पाइपलाइन फुटली आहे. नियमित वीजपुरवठा होत नाही. असे उत्तर देवून मोकळे होतात. परंतु, उपाययोजना करण्यात येत नाही. पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.