यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी आयुष्यभर तोडफोडीचे राजकारण केले. त्यांनी कधीही स्वत:च्या भरोवशावर शंभर आमदार निवडून आणले नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केली.यवतमाळ जिल्ह्याच्या दौर्यावर असताना त्यांनी पवार यांच्यावर टीकेचा बाण सोडला. शरद पवार यांनी जेंव्हाजेव्हा सत्ता मिळविली. त्यावेळी तोडफोड करूनच मिळविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षांत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले. याच प्रमाणपत्र जनता देत आहे. शरद पवार यांच्या सर्टीफीकेटची गरज नाही, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.
शरद पवार यांनी आयुष्यभर तोडफोडचे राजकारण केले : भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची जिल्हा दौऱ्यावर असताना टीका
 
  
  
  
   
  