महाविकास आघाडीत राहिलो असतो तर रायगडचे तिन्ही आमदार पुन्हा निवडून आले नसते ! आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
मुरुड तालुका बौद्ध समाज संघ यांच्याकडून आमदार दळवी यांचा जंगी सत्कार
रायगडचा पालकमंत्री बदलावा यासाठी सर्वप्रथम आंदोलन रायगडच्या तीन आमदारांनी केले होते.तेथूनच सरकार बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या हळू हळू सर्व एकत्र येऊन आता शिंदे आमदार समर्थकांची संख्या ५० वर गेली आहे.अजूनही आमच्याकडे येणाऱ्यांचा राबता सुरु आहे.महाविकास आघाडीत राहिलो असतो तर रायगडचे तिन्ही आमदार पुन्हा निवडून आले नसते.विकास निधी जर राष्ट्रवादी काँग्रेस लाच मिळत असेल तर भविष्यात आमच्या आमदारकीला धोका निर्माण झाला असता. अजूनही काही सत्य बाहेर यावयाची आहेत.जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा संपूर्ण जनमत शिंदे गटाकडे जाणार आहे.लवकरच आमदार भारत गोगावले हे मंत्री बनणार असून पालकमंत्री सुद्धा तेच असणार आहे.तेव्हा विकासाची परिकल्पना काय असते ते आपण सर्वाना दाखवून देणार असल्याचे प्रतिपदान अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.
मुरुड या ऐतिहासिक नगरीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ५ कोटींची तरतूद झालेली आहे . सदरचा निधी आमदार दळवी यांनी मिळवून देऊन सदरचे पैसे मुरुड नगरपरिषदेला वळते केले असून लाव्कलरच येथील स्मारकाच्या कामास सुरुवात होणार आहे.हे महत्वपूर्ण काम आमदार यांनी केल्याबद्दल मुरुड तालुका बौद्ध समाज संघ यांच्याकडून आमदार दळवी यांचा जंगी सत्कार मुरुड शहरातील माळी समाज हॉल येथे करण्यात आला.
मुरुड तालुका बौद्ध समाज संघाचे केंद्रीय समिती अध्यक्ष किशोर शिंदे सिरचिटणीस प्रदीप उमटेकर स्मारक सचिव मंगेश येलवे तालुका अध्यक्ष वसंत मोरे,आर पी आय मुरुड तालुका अध्यक्ष बबन शिंदे केंद्रीय समिती उपाध्यक्ष दीपक कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
आमदारांच्या सत्कारासाठी मुरुड तालुक्यातील बौद्ध समजणे प्रचंड गर्दी केली होती.यावेळी व्यासपीठावर पनवेल महापालिकेचे जगदीश गायकवाड , मुख्याधिकारी पंकज भुसे,भरत बेलोसे,ऋषिकांत डोंगरीकर,शुभांगी करडे,नांदगाव ग्रामपंचायत माजी सरपंच भाई सुर्वे,माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील,आदी सह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी आमदार दळवी यांनी स्मारकाच्या माध्यमातून समाजाला नवी प्रेरणा मिळावी . या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास त्यांनी बौद्ध समाज सेवा संघाला दिला
महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने गैरफायदा घेत सेनेला गाफिल ठेवले . आघाडीने कार्यकाल पूर्ण केला असता तर शिवसेनचे ५ आमदार देखिल निवडून आले नसते .आमच्या पक्षाला मान्यता व चिन्ह ही मिळेल असे सुतोवाच त्यांनी केले .
मुरुड ही स्व .आनंद दिघे यांची जन्मभूमी आहे या शहराच्या विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे ते म्हणाले .
या वेळी पनवेल महापालिकेचे उप महापौर जगदीश गायकवाड यांनी भीम सैनिकांना उद्देशून केलेल्या भाषणात संविधानिक अधिकार ही संजीवनी असुन डॉ .बाबासाहेबांच्या अनुयायांनी स्मारक उभारणी साठी जी चिकाटी आणि जिद्द दाखवली त्या सर्व स्थानिय कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले .
आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांतून स्मारक उभारणी साठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल बौद्ध समाज कृतज्ञ असल्याचे सांगुन
आमदारांच्या मागे संपूर्ण ताकदीनिशी उभे राहू असे आश्वासन दिले
अध्यक्षीय भाषणात किशोर शिंदे म्हणाले की,
४५ वर्षे डॉ .बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय प्रलंबित होता . अनेक आमदार खासदारांनी आश्वासना व्यतिरिक्त काही दिले नाही . मात्र आमदार दळवी यांनी आमच्या भावनांचा आदर करीत दोन वर्षात स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला . त्यांचे जाहीर आभार व्यक्त करीत मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या सकारात्मक भूमिकेला दाद दिली .
या कृतज्ञ सोहळ्यासाठी संपूर्ण मुरुड तालुक्यातून अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटित शक्तीचे प्रदर्शन केल्याबद्दल धन्यवाद दिले .