परभणी / प्रतिनिधी:- गेल्या अनेक वर्षा पासून शासन दरबारी विनंत्या अर्ज करून ही आज पर्यंत जिल्हातील पालम तालूक्यातील दिग्रस बंधार्‍यात तालूक्यातील फरंकडा गावातील शेतकर्‍यांच्या जमीनी शासनाने घेतल्या पण मावेजा देण्यास सरकार व अधिकारी यांनी अक्षम दूर्लक्ष केले तर अनेक वेळा शासनदरबारी विनंती अर्ज देऊन मावेजाची मागणी प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मुख्यमंत्री ठाकरे , पालकमंत्री , जिल्हाधिकारी , पाठबंधारे अधिकारी यांच्याकडे मागणी करून ही पालम तालूक्यातील शेतकर्‍यांना मावेजा पासून वंचित ठेवण्यात आले.तरी राज्याचे कर्तव्य दक्ष मूख्यमंत्री , जाणता राजा एकनाथ शिंदे यांनी पालम तालूक्यातील शेतकर्‍यांच्या मावेजाचा प्रश्न सोडवून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्रस्त शेतकरी प्रसाद पौळ यांनी एका ईमेल द्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.

सविस्तर वृत्त असे की,परभणी जिल्हातील फरकंडा येथील दिग्रस बंधारा प्रकल्पात तालूक्यातील शेतकर्‍यांच्या जमीनी मोठ्या प्रमाणात गेल्या पण मावेजा मिळाला नाही त्यामूळे शेतकर्‍यांनी शासनदरबारी अर्ज विनंत्या केल्या पण मार्ग निघाला नाही. राज्यात सेना भाजपाचे सरकार स्थापन झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून आता आपल्याला न्याय मिळेल व राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री , शेतकरी पूत्र , जानते राजे एकनाथराव शिंदे शेतकर्‍यांना मावेजा मिळवून देतील म्हणून त्रस्त शेतकरी प्रसाद पौळ यांनी मुख्यमंत्री यांना ईमेल पाठवून शेतकर्‍यांची व्यथा दिनांक २८/०८/२०२२ रोजी मांडली.