स.भु.बिडकीनमध्ये क्रीडादिन उत्साहात साजरा

बिडकीन( वार्ताहर) पैठण तालुक्यातील श्री.सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन येथे हॉकीचे जादूगार डॉ.ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा‌दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे ,मानद मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, ज्ञानेश्वर चाटुपळे,विलास सोनजे, तुषार अहिरे उपस्थित होते. प्रमुख अतिथी यांच्या हस्ते डॉ.ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्राची काळे,कल्याणी पडीयाल या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. प्रशालेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनींनी अतिशय सुंदर असे योगासने सादर करीत मानवी जीवनातील योगाचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा शिक्षक मोहम्मद आसिफ शेख, हेमंत जोशी , किशोर नांवकर, अनुराधा मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भव्य अशा क्रीडा विषयक माहितीचे प्रदर्शन आयोजित केले होते. संपूर्ण शालेय परिसरात क्रीडा विषयक बॅनर्स लावून खेळाविषयी जागृती करण्यांत आली होती.यानंतर विविध खेळ घेण्यात आले. दिनेश संन्यासी, तुषार अहिरे, मोहम्मद आसिफ शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनातील खेळाचे महत्त्व सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी हिवाळे हिने तर आभारप्रदर्शन कल्याणी पडीयाल हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले