बीड (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा येथे पुर्वीपासून पोलीस चौकी आहे. परंतु आता कडा शहरांमध्ये मोठी बाजारपेठ आहे.त्याचबरोबर गुन्हेगारीचेही प्रमाण वाढत असल्याने पोलिस चौकीचे रूपांतर पोलीस स्टेशनात व्हावे अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी केली आहे.कडा येथील शासकीय विश्रामगृहात पोलीस चौकी दुरक्षेत्र आहे.तसेच
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
शासनाने त्यांना स्वतःची जागा उपलब्ध करून द्यावी.त्याचबरोबर आष्टी पोलीस स्टेशनचे विभाजन करावे व कडा पोलीस चौकीला स्टेशनचा दर्जा द्यावा.कडा शहर हे सरासरी २० हजार लोकसंख्येचे शहर आहे.कडा शहरांमध्ये महाविद्यालय,बाजार समिती, राष्ट्रीय महामार्ग असल्याने याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.कडा शहरातील ५कि.मी.अंतरावर काही खेडेगाव आहेत. परंतु ती गावे अंभोरा पोलीस स्टेशनला जोडले गेलेली आहेत.
यामध्ये डोंगरगण,देविनिमगांव,साबलखेड,लिंबोडी,खिळद,अशा प्रकारे विविध गावे अंभोरा पोलीस स्टेशनला जोडले गेली आहेत.या गांवाना भौगोलिकदृष्ट्या अंभोरा पोलीस स्टेशन दुर पडतात व ही गावे कडा शहरास जवळ आहेत.अलीकडील काळात कडा शहरांमध्ये दरोडा,चोरी,खुन,बलात्कार अशा विविध प्रकारच्या घटना घडत आहेत,आरोपींवर कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही.त्या अनुषंगाने कडा शहरात पोलीस चौकी ऐवजी पोलीस स्टेशन झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी रवींद्र ढोबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.