मुख्य प्रशासन नगर परिषद मंगरूळ नाथ यांनी सध्या धार्मिक सण असुन सध्या शहरातील काही लोकांच्या घरी महालक्ष्मी पूजन असून व त्यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम असतात अशा वेळेस शहरामध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी तिसऱ्या दिवशी नळ सोडून पाणीपुरवठा करण्यात यावे, अशी मागणी मा.नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे.

मुख्य प्रशासन नगर परिषद मंगरूळपीर मुख्य अधिकारी नगर परिषद मंगरूळपीर मधील प्रभाग क्रमांक दोन मध्ये काही लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तरीपण नागरिकांना पिण्याचे पाणी न मिळाल्यास नगर परिषदेला येथील नागरिक कोणताही घर टॅक्स भरना करणार नाहीत. त्वरित आठ दिवसात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले नाही तर नगरपरिषद मधील गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार. तरी मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद यांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांची पिण्याची पाण्याची समस्या मिटवावी

आगामी गणेश उत्सव,महालक्ष्मी उत्सव असल्यामुळे नागरिकांना पाण्याची नितांत गरज आहे.याबाबत माजी नगरसेवक अनिल गावंडे यांनी निवेदन दिले असून प्रतिलिपी आणि उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय मंगरूळ पीर यांना दिले आहे.