सोलापूर : दोन वर्षांपासून वेळोवेळी सूचना करूनही विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपत्र सादर न केल्या प्रकरणी पोलीस नाईक विरुद्ध पोलीस निरीक्षकाने गुन्हा दाखल केला आहे.
विकास दगडु देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) फौजदा चावडी पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत पोलिस नाईक सिध्दाराम धरेप्पा बरगुडे, सध्या नेम सलगर वस्ती पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सन २०१९ पासुन ते सन २०२१ पर्यंत फौजदार चावडी पोलीस ठाणेत पोलिस नाईक बरगुडे यांनी प्रलचित गुन्ह्यामध्ये न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्याचा कालावधी होवून गेलेला आहे. विदयमान वरीष्ठ पोलीस निरीक्षक तसेच तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी पोना बरगुडे यांना गुन्हे निर्गती करीता वेळोवेळी आदेश दिलेले आहेत.
तरी देखील त्यांनी आदेशाकडे दुर्लक्ष करुन गुन्हे निर्गती केलेली नाही. त्यामुळे कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल फिर्यादी देशमुख यांनी बरगुडे विरुद्ध सरकार तर्फे तक्रार आहे म्हणून. याचा तपास सपोनि गायकवाड हे करीत आहेत.